संचारबंदी काळात भक्तांनी श्री यल्लम्मा देवी दर्शनास येणे टाळावे: पोलीस निरीक्षक उत्तम जाधव

जत येथील श्री यल्लम्मा देवी परिसरात ७ दिबस जमावबंदी


जत/प्रतिनिधी: कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिर समिती व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जत येथील श्री यल्लम्मा देवी परिसरात ७ दिबस जमावबंदी लागू करण्यात अली आहे. यामुळे बाहेरून येणाऱ्या भक्तांनी श्री यल्लम्मा देवी दर्शनास येणे टाळावे असे आवाहन पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांनी केले.

          तसेच मंदिर परिसरात कलम १४४ ही लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लम्मा देवीची यात्रा ८ ते १३ जानेवारी दरम्यान भरणार होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आल्याने यात्रा काळात भाविकांना दर्शनासाठी मंदिरात बंदी राहणार आहे. ट्रस्ट व मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यामुळे इतर भक्तांनी जमावबंदीचा आदेश उठेपर्यंत मंदिर परिसरात येऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments