प्रजासत्ताकदिनादिवसी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

दिलीप बिल्डकॉन कंपनीचा शेतकर्यांवर अन्याय प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष


जत/प्रतिनिधी: दिलीप बिल्डकॉन कंपनीने उत्खनन करताना मौजे बेवनूर ता.जत येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर केलेल्या अतिक्रमनाची भरपाई मिळावी. व होणारे अतिक्रमण तात्काळ थांबवावे. मोठ्या बोअर ब्लास्ट व अमोनिया वापराने झालेल्या घरांचे व शेतीचे नुकसान भरपाई मिळावी. उत्खननामुळे ध्वनी प्रदुषण व हवा प्रदुषण थांबवावे. त्वरीत संरक्षण कंपाउंड करावे. तसेच दिलीप बिल्डकॉन कंपनीचे अवैध उत्खनन व फॉरेस्टलगतचे खडीक्रेशर, अवजड वाहतूक बंद करावी. कंपनीच्या अवजड वाहतुकीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरस्ती करावी. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे व मा.जिल्हाधिकरी यांच्याकडे वेळोवेळी देऊनही त्यांचेकडून कोणतीही कारवाई कंपनीवर अथवा कंपनीच्या अधिकार्यांवर झाली नाही व विनंती करून देखील पोलीस ठाणे जत यांचेकडून प्रत्यक्ष स्थळपाहणी व पंचनामा देखील केला गेला नाही. २५ जानेवारी पर्यंत न्याय न मिळाल्यास, संभाजी ब्रिगेड सांगली जिल्हा व शेतकरी यांच्यावतीने दि. २६ जानेवारी २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहे. असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments