जत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व तर कॉग्रेस सोबत ऑल इंडिया पँथरची जोरदार मुंसंडी


जत/प्रतिनिधी: जत तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप अशा रंगलेल्या तिरंगी लढाईत काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरला आहे. मात्र त्यांनी शेगांव, उमराणी, उटगी, अंकले या प्रमख ग्रामपंचायती गमावल्या आहेत. दुसरीकडे भाजपने मोठया ग्रामपंचायतीसह ९ गावातील सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादीने यंदा ग्रामपंचायतीच्या सत्तेत प्रवेश केला आहे. जनतेने आमदार विक्रमसिंह सावंतउ व भुपेंद्र (दादा) कांबळे यांच्यावर विश्वास व्यक्त केला.

           नुकत्याच जत तालुक्यातील पार पडलेल्या अनेक ग्रामपंचायतीमध्ये दलित पँथरचे सहकारी व पदाधिकारी यांचे नातेवाईक तसेच कार्यकर्ते निवडून आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ऑल इंडिया पँथर सांगली जिल्हा अध्यक्ष भुपेंद्र कांबळे (दादा) यांनी गुड्डापूर येथील सौ. माधवी सर्जे व सनमडी-मायथळ चे सौ.उमाताई कांबळे, मिंढीगिरी चे श्री. आभिजित आपासाहेब कांबळे, सौ. प्रियांका सुनिल कांबळे, सनमड़ी चे सुनिल कांबळे, सौ. लताताई कांबळे, गुगवाड चे शंकर कांबळे, शिंगणगांव चे विशाल सर्जे यांना निवडून आल्या बद्दल शुभेच्छा दिल्या व येणाऱ्या कारकिर्दीत विकासात्मक दुरष्टिकोन ठेवून विकास करावा यासाठी त्यांना संबोधीत केले यावेळी तालुक्यातील ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments