रेवनाळ ग्रामपंचायत विद्यमान सरपंच धनाजी पाटील यांचा अविश्वास ठरावावर विजय मिळवल्या बद्दल आ. विक्रमसिंह सावंत व काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार


जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील रेवनाळ ग्रामपंचायत निवडणूक 2017 मध्ये झाली. त्यावेळी धनाजी पाटील हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडुन आले होते. त्यांच्या बरोबर 4 सदस्य त्यांच्या गटाचे निवडून आले, गावाचा कारभार चांगला चालला असतांना गावातील भाजपा व राष्ट्रवादी नेत्यांनी सदर लोकनियुक्त सरपंचावर सरपंचाच्या गटातील सदस्य फोडून अविश्वास ठराव डिसेंबर 2020 मध्ये पारित केला. सदर ठराव जिल्हा अधिकारी यांच्या कडे पाठवण्यात आला. त्यावर मा.जिल्हाधिकारी यांनी परत लोकनियुक्त सरपंचाचा पदावर रहाणे अगर न रहाने यांचा फैसला गावातील जनतेने करावा असे आदेश दिले त्याप्रमाणे दि.1 जानेवारी 2021 ला निवडणूक घेण्यात आली. लोकांनी मतदान केले त्या मध्ये परत विद्यमान सरपंच धनाजी पाटील 16 मतांनी आघाडी घेऊन निवडून आले. यावरून जनता विरोधकांचे मनसुबा हणून पाडला, गावातील आजी माजी जि.प.पं.स.सदस्य विद्यमान ग्रामपंचायत 9 सदस्य असे मातबर नेते असताना राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी मोठी ताकत लावून सदर विद्यमान सरपंचांना पुन्हा पदावर बसवले. यात काँग्रेसची ताकत जनतेने दाखवून दिली. यामुळे तालुक्यातील होणाऱ्या चालू ग्रामपंचायत निवडणूकिवर याचा चांगला परिणाम होणार आहे. निवडून आल्यानंतर सरपंच धनाजी पाटील यांचा जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मा.आमदार विक्रम दादा सावंत तसेच जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पाराया बिराजदार, माजी पं स सभापती बाबासाहेब तात्या कोडग यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जलोश व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments