कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त राजे रामराव महाविद्यालयात ज्ञानशिदोरी दिनाचे आयोजन


जत/प्रतिनिधी : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त राजे रामराव महाविद्यालय जत येथे दिनांक 17-01-2021 रोजी ज्ञानशिदोरी दिनाचे आयोजन केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ आप्पासाहेब भोसले यांनी दिली.

          यावेळी बोलताना प्राचार्य भोसले म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी आपणांस जो ज्ञानदानाचा, शिक्षणप्रसाराचा व समाजसेवेचा वारसा दिला आहे, तोच वसा आणि वारसा आज कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे आपल्या कार्यातून पुढे घेऊन जात आहेत. याबद्दल कृतज्ञता म्हणून मागील वर्षी 'शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे जन्मशताब्दी वर्षा पासून त्यांचा वाढदिवस दि.१७ जानेवारी हा विवेकानंद सप्ताहातील दिवस ज्ञानशिदोरी दिन' म्हणून यापुढे प्रतिवर्षी साजरा करण्यात येत आहे. याला अनुसरून या वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने रविवार दि. १७ जानेवारी २०२१ रोजी महाविद्यालयात  'ज्ञानशिदोरी दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

          या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी आपापल्या वतीने विद्यार्थ्यांनी वाचण्यायोग्य पुस्तके एकत्र जमा केली आहेत. त्यांचे प्रदर्शन भरवून त्यानंतर ती पुस्तके महाविद्यालयातील गरीब, हुशार, होतकरू व वाचनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना 'ज्ञानशिदोरी' म्हणून विनामुल्य भेट देणार आसल्याचे सांगितले. या उपक्रमातून वाचनाचा आणि ज्ञानार्जनाचा संस्कार विद्यार्थ्यांवर होईल व त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण होईल. असे यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ आप्पासाहेब भोसले म्हणाले.

Post a Comment

0 Comments