संत निरंकारी मंडळाचे वतीने जत येथे १७ रोजी रक्तदान शिबिर


जत/प्रतिनिधी; संत निरंकारी चँरिटेबल फौडेंशन दिल्ली शाखा जत याचे वतीने दिनांक १७ जानेवारी रोजी श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल जत येथे सकाळी ८ ते सायं ४ वाजेपर्यत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

       संत निरंकारी मंडळ हे समयाचे सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज याचे मार्गदर्शनाखाली अध्यात्मा बरोबर रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, नैसर्गिक आपत्ती वेळी मदत करणे, अशी अनेक सामाजिक कार्य करीत आहे. खऱ्या अर्थाने हे सर्व निरंकारी मंडळाच्या शिकवणीने मानसाला मानसातल्या खऱ्या ईश्वराची ओळख करून संपूर्ण मानवाला एकत्र आणून विश्वबंधुत्व निर्माण करण्याच्या शिकवणिमुळे हे सर्व कार्य निस्वार्थ भावनेने होत आहे. तरी या रक्तदान शिबिरामध्ये सर्वानी जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे आवाहन जत शाखेच्या स्थानिक मुखीनी केले आहे.

Post a Comment

0 Comments