जत तालुक्यातील सात गावांमध्ये लक्षवेधी निवडणुक

त्यापैकी सहा ग्रामपंचायतीत दुरंगी, तर एका गावात तिरंगी लढत

जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका लक्ष्यवेधी होत आहेत. त्यापैकी सहा ग्रामपंचायतीत दुरंगी, तर एका गावात तिरंगी लढत होत आहे.

        तालुक्यातील डोर्ली, गुद्दापूर, शेगाव, सिंगनहळ्ळी, उटगी, वळसंग या सहा ग्रामपंचायतींत दुरंगी, तर उमराणीमध्ये तिरंगी लढत होत आहे. या सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका जत तालुक्यात लक्ष्यवेधी ठरत आहेत. आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि प्रमुख राजकीय नेत्यांचा सहभाग असल्यामुळे लढती लक्ष्यवेधी ठरत आहेत. उमराणीमध्ये शेतकरी संघटनेचे दुंडाप्पा बिरजदार, भाजपचे आप्पासाहेब नामद, काँग्रेसचे मल्लेश कत्ती यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले असून, त्यांच्यात तिरंगी लंढत होत आहे. येथे राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पॅनल तयार केले आहे. डोर्ली ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुकेश पवार व भाजपचे पिंटू माने यांनी एकत्र येऊन पॅनल तयार केले आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे पॅनल आहे. त्यामुळे तेथे दुरंगी लढत होत आहे. वळसंग येथे कार्यकर्त्यांनी पक्ष बाजूला ठेवून पॅनल तयार केले आहे. त्यामुळे दोन पॅनलमध्ये सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. येथे भाजपविरुद्ध काँग्रेस असा दुरंगी सामना आहे. जेवणावळी आणि कार्यकर्त्यांच्या गाटीभेटी घेऊन मतदारांचे मन वळवण्यासाठी पॅनल प्रमुख नेतेमंडळी सक्रिय झाली आहेत.


Post a Comment

0 Comments