घोलेश्वर मध्ये चौरंगी लढत; आपले ग्रामविकास शेतकरी पॅनेल जोरदार मुसंडी


जत/(प्रतिनिधी):जत तालुक्यातील घोलेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सात जागेसाठी बावीस उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत आपले ग्रामविकास शेतकरी पॅनेलच्या प्रमुख नेत्यांनी तरुण आणि सुशिक्षित उमेदवारांना संधी दिल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

सत्ताधार्यासह विरोधकांनी ग्रामपंचायत ताब्यात घेण्याकरिता व्यूव्हरचना आखून उमेदवारांची निवड केली आहे. तालुक्याचे लक्ष लागलेल्या घोलेश्वर ग्राम पंचायतीत स्थानिक पातळीवर आघाडी स्थापन करून चार पॅनेल तयार केले आहेत. यावेळच्या निवडणुकीत प्रथमतःच चार पॅनेल असल्याने निवडणुकीत चांगलीच चुरस वाढली आहे. त्यातच आपले ग्रामविकास शेतकरी पॅनेलने अभ्यासू व स्वच्छ प्रतिमेचे असे तगडे उमेदवार दिल्याने निवडणूक चुरशीची होणार असून धक्कादायक निकाल अपेक्षित आहे. गावचे अभ्यासू व गतिमान नेतृत्व असणारे माजी सरपंच रमाकांत आटपाडकर आपले ग्रामविकास शेतकरी पॅनेलचे नेतृत्व करीत आहेत. रियाजमोहशीन नाईक, सपना हेगडे, सुनीता यमगार, गणेश तांबे, सुजाता आटपाडकर, सविता आटपाडकर, यांना उमेदवारी देवून निवडणुकीत रंग भरला आहे.

वाड्या वस्त्यांवर काही ठिकाणी वीज नाही. गटारी, रस्ते यांची दुरवस्था झाल्याचा जोरदार आरोप आपले ग्रामविकास शेतकरी पॅनेलकडून होत आहे. नळपाणी पुरवठा योजनेची सुधारणा करत घर तेथे नळाचे कनेक्शन, वीज, गटारी, रस्ते, आरोग्य व शिक्षणाच्या सर्व सुविधा देणार असल्याचे माजी सरपंच रमाकांत आटपाडकर यांनी सांगितले. ग्रामपंचायतीमध्ये एकूण तीन प्रभाग असून प्रभाग एक चौरंगी तर इतर प्रभागात तिरंगी लढत होत आहे. राजकीय आखाडा तापला असून निवडणूक प्रचारासाठी फक्त दोन दिवस राहिले आहेत. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत वाढली आहे.

धनशक्तीच्या जोरावर मतदारांना फसवण्याचा विरोधकांचा कुटील डाव ह्या वेळी जागरूक मतदारच हाणून पडतील.

Post a Comment

0 Comments