जतची श्री यल्लमा देवीची यात्रा इतिहासात पहिल्यांदा मोजक्याच भाविकांचे उपस्थितीत संपन्न

पुढील वर्षी भरविण्यात येणारे यात्रेच्या तारखा जाहीर

जत/प्रतिनिधी: श्री यल्लमा देवी प्रतिष्ठान जत यानी इतिहासात पहिल्यांदाच मोजक्याच भाविकांचे उपस्थितीत यात्रा पार पडली. यात्रा कालावधीत होणारे देविचा गंधोटगीचा, नैवेद्य व किचाचा हे सर्व कार्यक्रम पार पाडले. रवीवारी यात्रेचा शेवटच्या दिवशी देविची नगर प्रदक्षिणा व देविचे किचाचा कार्यक्रम होता. दरवर्षी प्रमाणे देविचे पुजारी हे पालखी सोबत घोड्यावरून नगरप्रदक्षिणेसाठी न जाता. श्री यल्लमादेवी मंदिर परिसरात पालखी प्रदक्षिणा घालून नंतर देविचे पुजारी सुभाष कोळी यांनी अग्निकुंडात प्रवेश केल्यानंतर या वर्षीच्या यात्रेची समाप्ती झाली.

         दरवर्षी यात्रा कालावधीत श्री यल्लमादेवी मंदिर परिसर विविध व्यवसाईक व पाळणे, तमाशाचे फड, विविध मनोरंजनाचे खेळ व लाखो भाविकानी गजबजून जात होता. परंतु यावेळी इतिहासात प्रथमच ही यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याने देविच्या लाखो भक्तांना देविच्या दर्शनापासून दूर रहावे लागले आहे. रविवारी देविचे किचाचा कार्यक्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजेडफळे यांच्या अध्यक्षतेखाली जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला. यावेळी पुढील वर्षी यात्रा 30 डिसेंबर 2021 ते 3 जानेवारी 2022 या कालावधीत पार पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

          यावेळी जतचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, पोलीस पाटील मदन पाटील, प्रा.कुमार इंगळे, पालखीचे मानकरी, तसेच मनोहर कोळी, चंद्रकांत कोळी, अमर जाधव, गणपतराव कोडग, बाबासाहेब कोडग, बाळासाहेब जाधव, संग्राम शिर्के, मोहन मानेपाटील, पापा सनदी, अरूणराव शिंदे, विश्वनाथ सावंत आदि उपस्थित होते. याप्रसंगी श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी पुढील वर्षी भरविण्यात येणारे यात्रेच्या तारखा जाहीर केल्या.

Post a Comment

0 Comments