जत ते गाणगापुर पदयात्रा तसेच श्री. अंबिका नवरात्र उत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सदामामा जाधव यांचे निधन

जत/प्रतिनिधी: श्री. अंबिका नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके मामा श्री. सदाशिव रामचंद्र जाधव (सदामामा) वय- ७६ वर्षे यांचे गुरूवारी रात्री सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना प्राणज्योत मावळली. सदामामांच्या जाण्याने जत शहरावर शोककळा पसरली आहे.

          सदामामा जाधव हे बंडीग ऑफिस मध्ये नोकरी करून सेवानिवृत्त झाले होते. जत येथील श्री. अंबिका नवरात्र उत्सव मंडळाचे ते आधारस्तंभ होते. सदामामा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दरवर्षी श्री. अंबिका नवरात्र उत्सव चांगल्या प्रकारे पार पाडला जात असे. जत येथून दरवर्षी श्री तिर्थक्षेत्र गाणगापुर या ठिकाणी हजारो दत्त भक्तांना घेऊन चाललेली दिंडी सदामामा यांच्या नेतृत्वाखाली जात असे. तसेच सोलापूर ते तुळजापूर पदयात्रा ही सदामामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जात असे. सदामामा म्हणजे श्री. अंबिका नवरात्र उत्सव मंडळ व सदामामा म्हणजे तुळजापूर पदयात्रा व श्री. यल्लमा देवीची यात्रा हे समिकरण जुळले होते.

         सदामामा जाधव याना जतमध्ये ओळखत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही असे झाले नाही. मामांच्या जाण्याने श्री. अंबिका नवरात्र उत्सव मंडळ, श्री. दत्ता गाणगापुर पदयात्रा, तुळजापूर पदयात्रा करणारेंना मामांची उणीव यापुढील काळात जाणविल्याशिवाय राहाणार नाही. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यातून त्यांना लवकर बाहेर पडण्याची शक्ती आई श्री. जगदंबा त्यांना देवो ही आई जगदंबाचरणी प्रार्थना. 

         सदामामा यांच्या पश्चात पत्नी शालन, मुलगा सुनिल, मुली अंजना व मंजूषा तसेच सुन व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments