जत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे काम प्रगती पथावर


जत/प्रतिनिधी: जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे शुशोभीकरण नगरपरिषदेकडून करण्यात येत आहे. अनेक दिवसापासून रखडलेल्या उद्यानाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. उर्वरित जागेमध्ये संरक्षण भिंत, आतील स्वच्छता मुरमीकरणाची कामे सुरू आहेत. नगरपरिषदेचे शिक्षण सभापती संतोष(भुपेंद्र) कांबळे यांच्या पाठपुराव्यामुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा विकास व सुधारणा गतीने सुरू आहे. उद्यानाच्या आतील बाजूस मैदानावरती शुशोभीकरणासह काही बांधकामेही करण्यात येणार आहेत. नुकतीच कांबळे यांनी भेट देत कामासंदर्भातील सुचना दिल्या. शहरातील महत्वाचे डॉ.बाबासाहेब आंबडेकर उद्यानाचे काम अनेक दिवसापासुन रखडले होते. आंबेडकर जनतेचे वैभव असलेल्या उद्यानाचा विकास करण्यात येत आहे. भविष्यात शहरातील महत्वाचे स्थान हे उद्यान ठरले, असे नियोजन आहे. असे भूपेंद्र कांबळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments