जत ग्रामीण रुग्णालय येथे कोविड-19 लसीकरन मोहिमेस सुरवात । कोविशिल्ड ही कोरोनाची लस पूर्णतः सुरक्षित; आमदार विक्रमसिंह सावंत

जत/प्रतिनिधी: जत ग्रामीण रुग्णालय येथे कोविड-19 लसीकर मोहिमेस आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरवात करण्यात आली. आज सकाळी 11 वाजता जत ग्रामीण रुग्णालयात कोविशिल्ड लसीकर मोहिमेस प्रारंभ जत येथील डॉ.रविकुमार जीवानावार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बंडगर यांना पहिली लस टोचून करण्यात आली.

        यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की, सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड ही कोरोनाची लस पुर्णतः सुरक्षित आहे. त्यामुळे ही लस सर्वांनी घ्यावी, अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आमदार सावंत यांनी केले. तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील 169 कर्मचाऱ्यांनी कोविशिल्ड लस घेण्यासाठी नाव नोंदणी केली होती.

         यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटी, तहसीलदार सचिन पाटील, माजी पं. स. सभापती बाबासाहेब कोडग, जत पं. स. सदस्य रविंद्र सावंत, दीघवीजय चव्हाण, डॉ. अशोक मोहिते, सांगली सिव्हिलचे डॉ. परवेज नाईकवाडी, डॉ. विशाल खोत, डॉ. अभिजित पवार, डॉ. तुळजाणवर, डॉ. रवी जिवनावर, डॉ. शिवाजी खिलारे, भीमराव सानप, महेंद्र राऊत व सर्व स्टाफ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments