जत डॉ.बाबासाहेब आंबेडकर उघान लगतच्या नागरी वस्तीतील कुपणालिकेवर नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांनी स्वखर्चातून बसवली मोटर


जत/प्रतिनिधी: जत शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उघान लगतच्या नागरी वस्तीमधील कुपणालिका गेली कित्येक दिवस बंद होती. त्यामुळे नागरिकांना मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. याची माहिती नगरपरिषदेचे सभापती भूपेंद्र कांबळे याना मिळताच त्यांनी स्वखर्चातून त्या कुपणालिकेवर विद्युत मोटर बसवून पाणी पुरवठा सुरू केला.

             यावेळी भूपेंद्र कांबळे म्हणाले की, डॉ.आंबेडकर उद्यानाजवळील या नागरी वस्तीलासाठी असणारी कुपनलिका गेल्या अनेक दिवसापासून बंद होती. याची परिसरातील काही नागरिकांनी मला माहिती दिली. यावेळी आम्ही तात्काळ त्या कुपनलिकेची पाहणी करून नवीन विद्युत मोटर खरेदी करून पाणी पुरवठा सुरू केला आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना पाणी उपलब्ध झाले आहे. पाणी प्रश्न कायम स्वरूपी मिटल्यामुळे या परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments