आंवढीत दारूबंदी असून देखील दारूविक्री । महिला आक्रमक । स्थानिक पोलिसांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप


जत/प्रतिनिधी : जत तालुक्यातील आवंढी येथे गावातील महिलांनी दारू बंदीसाठी मतदान घेत दारूबंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असतानाही. आदेशाचे उल्लंघन करत गावात पुन्हा अवैध दारू विक्री सुरु करण्यात आली आहे. या घटनेमुळे जत पोलीसांची निष्क्रियता स्पष्ट होत आहे. दारू विक्री तात्काळ बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंवढीतील महिलांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आवंढी ता.जत येथे मोठ्या प्रमाणात देशी, विदेशी व गावठी दारू विक्री केली जात आहे. यामुळे अनेकांचे कुंटुब उदधस्त होत आहेत. या प्रकाराने गावातील शांतता भंग होत आहे. अनेक गोरगरिब, मजूरांच्या कुंटुंबात वारंवार भांडणे होत आहेत. या पार्श्वभूमीवर गावातील महिलांनी एकत्रित येत 2018 मध्ये दारूबंदी विरोधात उठाव केला. उभी बाटली आडवी केली. गावतील संपूर्ण दारूबंदी होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क सांगली जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली दि.6/1/2019 रोजी आवंढी येथे गावातील महिलांचे गुप्त मतदान घेण्यात आले होते. या मतदान प्रक्रियेत एकूण 742 महिलांनी मतदान केले. त्यापैंकी 659 महिलांनी दारूबंदीसाठी मतदान करत बाटली आडवी करून दारूबंदीविरोधातील लढाई जिंकली होती. दि.19/01/2019 रोजी जिल्हाधिकारी सांगली यांनी (सी.एल.आर.112018/4327) या आदेशानुसार गावामध्ये कायमस्वरूपी दारू बंदीचे आदेश दिले होते. त्यानंतर काहीकाळ गावात दारू बंदी झाली होती.

मात्र काही महिन्यातच गावातील समाजकंटकांनी कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याच्या उद्देशाने गावात पुन्हा देशी व विदेशी दारू विक्री करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत जत पोलीसांना अनेकवेळा दारू विक्री सुरू असलेबाबत माहिती दिली होती. मात्र जत पोलीसांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. स्थानिक पोलीसांचे या अवैध व्यवसायिकांशी साटेलोटे असल्याने दारू विक्रेते थेट बंदी असतानाही उघड्यावर दारू विकून कायदाचा भंग करत आहेत. हा प्रकार निंदनीय असून, तात्काळ दारू बंदी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा गावातील महिलांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments