जत येथे शिक्षक भारती संघटनेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण


जत/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सांगली शाखा जत यांच्या वतीने सावित्री - फातिमा आदर्श शिक्षिका पूरस्कार आमदार विक्रमसिंह (दादा) सावंत तसेच उपस्थित  मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी सांगली जिल्हा परिषद शिक्षण सभापती सौ.आशाताई पाटील, जत प.स.उपसभापती विष्णु चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, जत नगरपरिषद शिक्षण क्रीडा सांस्कृतिक सभापती संतोष (भुपेंद्र) कांबळे, ऍड. प्रभाकर जाधव, सांगली जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष महेश शरनाथे, सरचिटणीस कृष्णा पोळ, जत तालुका प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष दिगंबर सावंत, कार्याध्यक्ष महेश चौगुले, कोशा अध्यक्ष बालम मुल्ला, प्रालमेंट बोर्ड अध्यक्ष कदर अत्तर, प्रालमेंट बोर्ड उपाध्यक्ष दीपक काळे, महिला जिल्हा अध्यक्ष विद्या चव्हाण, महिला सरचिटणीस सौ.सुनीता शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर माने व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments