केंद्र शासनाच्या कृषी कायद्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला जत मधून संमिश्र प्रतिसाद


जत/प्रतिनिधी: केंद्र शासनाच्या कृषी कायद्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला जत मधून संमिश्र प्रतिसाद मिळाला सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला तर बारा ते दोन वाजेपर्यंत 50 टक्के बंद. त्यानंतर संपूर्ण व्यवहार पूर्णपणे सुरळीत सुरू झाले. अत्यावश्यक सेवा वगळता दुपारपर्यंत सर्व व्यवहार ठप्प होते. बंद कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान तालुका काँग्रेस च्या वतीने श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार जत परिसरात तालुका काँग्रेसचे सर्व पदाधिकारी करकर्त्यांनी एकत्र येऊन केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करून कृषी कायदे केंद्र सरकारने पाठीमागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी आमदार विक्रम सावंत, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अप्पराय बिराजदार, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, जत तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुजय शिंदे, गणेश गिड्डे,  ऍड. युवराज निकम, संतोष भोसले, आदीजण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments