राजे रामराव महाविद्यालयात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा


जत /प्रतिनिधी :  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन राजे रामराव महाविद्यालय जत येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी प्राध्यापक एस.एस. चव्हाण सर यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रा. पुंडलिक चौधरी यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन व त्यांच्या महान कार्याच्या विविध प्रसंगांवर आपले विचार स्पष्ट करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, आर्थिक, वैचारिक, संशोधन यावर आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक  विभागप्रमुख  प्रा.ए. एच. बोगुलवार यांनी केले. तर आभार प्रा.डॉ. बी. एम. डहाळके यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा. आर. डी. कारंडे, प्रा.एम्. एच् करेन्नवार,  प्रा. एस. एस. नरळे, प्रा. एच्.डी. टोंगारे, नामदेव खुडे, तुकाराम शिंगाडे व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments