खरेदी केलेल्या शेतजमिनीची नोंद करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी लक्ष्मण कोळी यांचे प्रांताधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण

जत/प्रतिनिधी:  येळदरी ता. जत येथे खरेदी केलेल्या (गट नंबर व सर्वे नंबर ३२७) शेतजमिनीची नोंद करण्यासाठी सुडबुध्दीने टाळाटाळ करणारे जत येथील मंडळ अधिकारी संदीप मोरे व या प्रकरणात खोटी तक्रार करून जमीन हाडपण्याचा प्रयत्न करणारे गावकामगार कोतवाल सुभाष कोळी यांची खातेनिहाय चौकशी करुन त्यांची व त्यांना पाठीशी घालणाऱ्या वरीष्ठ अधिकाऱ्याच्या विरोधात कडक कारवाई करावी या मागणीसाठी लक्ष्मण कोळी, पूजा कोळी, वैभव कोळी, संदेश कोळी, नारायण कोळी, प्रकाश कोळी यानी जत येथे प्रांताधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले.

        याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १४ जानेवारी २०२० रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात सदर शेतजमिनीचा खरेदी दस्त करण्यात आला होता. त्यानुसार २० जानेवारी रोजी अर्ज देवून खरेदी नोंद करून घेतली आहे. त्यानंतर २ मार्च २०२० रोजी मंडळ अधिकारी यांच्याकडून आम्हांला लेखी कळविणेत आले की, सुभाष रामचंद्र कोळी कोतवाल जत यांनी तुमच्या विरोधात नोंद धरण्यास तक्रारी आर्ज दिला असून ११ मार्च रोजी आपण हजर राहावे असे कळविणेत आले होते. त्यानुसार मी स्वतः सर्व पुराव्यानिशी हजर राहिलो असता मंडळ अधिकारी व  सुभाष कोळी दोघेही गाव चावडीमध्ये हजर नव्हते. मी दिवसभर त्यांची वाट बघुन घरी निघुन गेलो आहे. सुभाष कोळी यांनी दिलेल्या अर्जामध्ये कोणतेही तथ्य नसून दिशाभुल आहे. संदीप मोरे यांना हाताशी धरून माझी जमीन हडप करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. असा आरोप करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments