मुमताज तांबोळी यांना सावित्री फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

जत/प्रतिनिधी;  सांगली जिल्हा शिक्षक भारती संघटनेकडून दिला जाणारा सावित्री फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार जत तालुक्यातील घाटगेवाडी जिल्हापरिषद मराठी शाळेतील शिक्षिका मुमताज हुसैन तांबोळी यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

पुरस्कार कार्यक्रमास जतचे आमदार विक्रम सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती आशाताई पाटील यांच्याहस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी जि. प. सदस्य सरदार पाटील, सुनीता पवार, प्रभाकर जाधव, नगरसेवक भुपेंद्र कांबळे, मनोज जगताप, विष्णू चव्हाण, स्नेहलता जाधव, महेश शरनाथे, कृष्णा पोळ आदीजन उपस्थित होते. 

          मुमताज तांबोळी या सण १९९३ पासून सेवेत असून त्यांनी जत तालुक्यातील बेवनूर, नवाळवाडी तसेच सांगली जवळील कवलापूर याठिकाणी सेवा केली आहेत. जत तालुका शिवसेना कार्यकर्ते रफिक शेख यांच्या त्या पत्नी आहेत. जत तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून एक, अशी पुरस्कार शिक्षिका निवड करण्यात आली आहे. यामध्ये मुमताज तांबोळी, उषा मिरजकर, जयश्री सुर्वे, अस्मिता खरात, भाग्यश्री प्रचंडे, काळमा कोरे, इंदुमती व्हनीकर, भारती हनगडी, सिंधू होती, कविता जावळकोटी, शशिकला पाटील इत्यादी शिक्षिकांना पुरस्कार देउन गौरविण्यात आले.

Post a Comment

0 Comments