बिळूर येथील गॅस वितरक कंपनीचे गोडाऊन फोडून अज्ञात चोरट्यांकडून ३७ हजाराचा मुद्देमाल लंपास


जत/प्रतिनिधी: बिळूर ता.जत येथील जयश्री एच पी गॅस ग्रामीण वितरक कंपनीचे गोडाऊन व कार्यालय फोडून अज्ञात चोरट्यांनी ३७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे .ही घटना सोमवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी रात्री घडली आहे. याप्रकरणी मंगळवार दिनांक १ डिसेंबर रोजी रात्री उशिरा महेश उर्फ मलगोंडा पिरगोंडा पाटील वय ४७ यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे .

      याबाबत अधिक माहिती अशी की बिळूर ते जत रस्त्यावर बिळूर पासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर जयश्री एच पी गॅस कंपनीचे गोडाऊन व कार्यालय आहे अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री कार्यालय व गोडाऊन फोडून कार्यालयातील रेगुलेटर  जोडण्यासाठी वापरण्यात येत असलेली सुरक्षा पाईप, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर , एच पी कंपनीचे १४ किलो वजनाचे दोन सिलेंडर व रोख रक्कम ४ हजार रुपये असा सुमारे ३७ हजार ८५० रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे .सदरची घटना मंगळवारी सकाळी पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रात्री उशिरा जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे .या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार सचिन हाक्के करत आहेत.

Post a Comment

0 Comments