माशाच्या जाळीतून मगरीच्या पिल्लाची ॲनिमल राहतने केली सुटका


सांगली: हाक्के वस्ती हाळ भाग कारंदवाडी येथील प्रभाकर पाटील यांच्या शेता जवळील नदीपात्रात मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळीत मगरीचे पिल्लू गंभीरित्या अडकलेले आढळले यावेळी प्रभाकर पाटील व अभिजित पाटील यांनी मगरीच्या पिल्लाला काईलीच्या सहाय्याने जवळ जाऊन जाळी कापुन तिला अडकलेल्या जाळीसहित नदी बाहेर घेतले. पण मागरीचे पिल्लू गंभीरपणे अडकल्याने त्यातून पिल्लाला सोडवणे त्यांना अवघड झाले. त्यांनी सदर घटना ॲनिमल राहत संस्थेस कळवली, ॲनिमल राहतचे प्राणी कल्याण निरीक्षण कौस्तुभ पोळ, योगेश इनामदार, प्रसाद सुर्यवंशी हे ताबडतोब घटना स्थळी पोहोचले. त्यांनी मगरीच्या पिल्लाची कमीतकमी वेळात तिची मानवीय पद्धतीने हाताळणी करून तिला जाळीतून मुक्त केले आणि कोणतीही इजा झाली नसल्याची खात्री केली. ॲनिमल राहत च्या कौस्तुभ पोळ यांनी तेथील नागरिकांना मगरीचे महत्व पटवून सांगितले तसेच त्यांच्या मधील मगरीबाबतचे गैरसमज दूर केले. वनविभागाचे वनरक्षण अमोल साठे यांच्या उपस्थित तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे आले.


Post a Comment

0 Comments