काशिलिंगवाडी उपसरपंच पदी सौ.संगिता नरळे


जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील काशिलिंगवाडी  ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सै संगिता नामदेव नरळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नूतन उपसरपंच सौ नरळे म्हणाल्या की, काशिलिंगवाडी गावाच्या विकासासाठी कायम तत्पर राहून जनतेला चांगली सेवा उपलब्ध करून देऊन, एक आर्दश गाव करण्याचा माझा कायम मानस आहे. यावेळी सरपंच आनासो कूटे, ग्रामसेवक अर्चना खिलारे, माजी उपसरपंच दत्तात्रय नरळे, बाळासाहेब मुटेकर, चेअरमन महावीर नरळे, शरद हिप्परकर, अध्यक्ष मच्छिंद्र कुटे, सदस्य माया हिप्परकर, अनिता कोळी, अंजना कदम व विठ्ठल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments