जत-बिळूर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

जत/प्रतिनिधी: जत ते बिळूर रस्त्यावर जतपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर अज्ञात मोटरसायकलने धडक दिल्याने श्रीशैल बाळाप्पा चिंतामणी (वय 60 रा. वज्रवाड ता. जत) याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. या प्रकरणी जत पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, चिंतामणी हे बिळूर कडून जत कडे बँकेच्या कामासाठी येत असताना जत जळत आल्या नंतर समोरून एका अज्ञात दुचाकी सायकल स्वराने त्याला धडक दिल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावर आपटून चिंतामणी याचा जागीच मृत्यू झाला आहे. सदरची घटना रस्त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांनी पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन अज्ञात धडक दिलेल्या वाहन चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा तपास लागला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बजरंग थोरात करत आहेत.

Post a Comment

0 Comments