स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काढण्यात आलेली कडकनाथ संघर्ष यात्रा पोलिसांनी रोखली


सांगली:  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काढण्यात आलेली कडकनाथ संघर्ष यात्रा पोलिसांनी रोखली व जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांचेसह तेरा जणांना ताब्यात घेतले. कडकनाथ घोटाळ्यातील मुख्य सूत्र धाराला अटक करा, अटक केलेल्या आरोपीची मालमत्ता जप्त करा. आदीसह अन्य मागण्यासाठी ही कडकनाथ संघर्ष यात्रा मोटर सायकल वरून इस्लामपूर कडे जाणार होती. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने स्टेशन चौकात जमले होते. कडकनाथ घोटाळ्यातील मुख्य सूत्र धरला अटक करा, अटक केलेल्या आरोपीची मालमत्ता जप्त करा, पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. मोटसायकलवरून कार्यकर्ते निघण्याच्या तयारीत असताना पोलीस निरीक्षक अजय सिंडकर यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येनं स्टेशन चौकात जमले. त्यांनी निघण्याच्या तयारीत असलेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू झाल्यानंतर झटापट झाली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. एकच गोंगाट उडाला सर्वांना ताब्यात घेवून पोलीस मुख्यालयात नेण्यात आले. रात्री उशिरा सर्वांना सोडून देण्यात आले. यावेळी महेश खराडे, विकास मगदूम, दिग्विजय पाटील, भागवत जाधव, संजय बेले, तानाजी साठे, सुरेश पचिब्रे, प्रताप पाटील, बाळासाहेब लींबेकाई, ज्ञानेश्वर बाड, दीपक मगदूम आदींना ताब्यात घेतले होते. या सर्वांना रात्री उशिरा सोडून देण्यात आले.

नजर कैद केले 

यावेळी खराडे म्हणाले की घोटाळा करणारे खुलेआम मोकाट फिरत आहेत. तर आंदोलन करणारे तुरुंगात अशी परिस्थिती आहेत. या दपशहीचा आम्ही निषेध करतो, माझ्या घराला बंदोबस्त लावण्यात आला होता नजरकैद करण्यात आले.


Post a Comment

0 Comments