बिनविरोध निवडणूक लढविणार्या ग्रामपंचायतीस ३० लाखांचा निधी देणार; आमदार विक्रमसिंह सावंत

जत/प्रतिनिधी: तालुक्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करणाऱ्या ग्रामपंचायतीला आमदार फंडातील ३० लाख रुपयांचा निधी ,याशिवाय शासनाकडून येणारा निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. अशी माहिती आमदार विक्रम सावंत यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पासाहेब बिराजदार उपस्थित होते .

            ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे आपापसातील हेवेदावे ,मतभेद, गटातटाचे राजकारण निर्माण होऊन सत्तासंघर्ष तयार होतो. यामुळे काहीवेळा विकास कामात आडथळा येत आहे. गावपातळीवरील लोकांमध्ये आपापसात एकोपा निर्माण होण्यासाठी निवडणुका बिनविरोध होणे अपेक्षित आहे. बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतीला विविध शासकीय योजनेतून मिळणाऱ्या सोयी - सवलती व आमदार फंडातील  ३० लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने घेण्यात आला आहे. मागील दहा महिन्यात कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. आपण सर्वजण गेली दहा महिने कोरोनाचा मुकाबला करत आहोत. सुरुवातीचे तीन-चार महिने लाँकडॉऊन मध्ये गेले त्यानंतर अनलॉक सुरू आहे. या  गंभीर घटनेमुळे ग्रामीण व शहरी भागातील जनजीवन विस्कळित झाले आहे. निवडणुका बिनविरोध करून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे आवाहन आमदार विक्रम सावंत यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments