सदाभाऊ खोत यांनी अगोदर कडकनाथ घोटाळ्यातील गंडा बसलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा; महेश खराडे

सांगली: कृषी कायद्याचे समर्थन करणाऱ्या आमदार सदाभाऊ खोत यांनी कडकनाथ घोटाळ्यातील गंडा बसलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, मग आत्मनिर्भर यात्रा काडावी अशी टीका स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली. त्याचबरोबर आम्हीही कडकनाथ घोटाळ्यात गंडा बसलेल्या शेतकऱ्यांना घेवून कडकनाथ यात्रा काढू व इस्लामपूर येथे माजी मुख्यमंत्री यांच्या सभेत कोंबड्या उधळू असा इशाराही त्यांनी दिला.

          कृषी धोरणाचे समर्थन करणाऱ्या सदाभाऊ यांनी हा कायदा एकदा डोळ्याखालून घालावा. या कायद्यात कॉन्ट्रॅक्ट फर्मिंग चे ही एक विधेयक आहे. कडकनाथ कुक्कट पालन हाही कॉन्ट्रॅक्ट फर्मिंग होते. या कडकनाथ स्कीम मुळे शेतकऱ्याचा फायदा झाला की तोटा झाला. हे साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे सह मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांचे प्रपंच उध्वस्त झाले. अनेकांनी आत्महत्या केल्या जमिनी गहाण ठेवून, विकून लाखो रुपये शेतक-्यांनी गुंतविले ,शेतकऱ्यांना काय मिळाले. कॉन्ट्रॅक्ट फर्मिंग फायद्याचे आहे. हे कोणत्या तोंडाने सदाभाऊ शेतकऱ्यांना सांगणार हा आमचा सवाल आहे. त्याचबरोबर शेतकरी आणि ऊद्योग पती यांच्यात करार झाला आणि संबधित कंपनीने शेतीमाल नेला नाही. तर हा वाद प्रांत आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे सोडवायचा आहे. त्यांनीही शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. तर न्यायालयात जाण्याची तरतूद नाही. याचा अर्थ पैशाच्या जोरावर उद्योग पती प्रशासकीय अधिकाऱ्यांना मँनेज करतील आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावतील हेच यातून स्पष्ट होते आहे. हा कायदा सरळ सरळ उद्योग पतीचे हित साधणारा आहे.

          खासगी बाजार समित्या काढायला आमचा विरोध नाही. मग तिथे एम एस पी चे बंधन का नाही. उसाला ज्या प्रमाणे एफ आर पी चे संरक्षण आहे. तसे तुर, मूग, उडीद, गहू, हरभरा या पिकांना का नाही. खासगी बाजार समितीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांनि शेतकऱ्यांना लुटण्याची खुली सुट या कायद्यातून मिळणार आहे. सहकारी बाजार समित्या शेतकरऱ्यांचे शोषण करतात ही वस्थुस्थिठी आहे. पण त्या बंद पाडणे हा उपाय नाही, त्या दुरुस्त करणे हा मार्ग आहे. सहकारी बाजार समित्या बंद पडल्यावर खाजगी बाजार समिती कसेही लूटतील. त्यावेळी शेतकरी कुणाकडेही दाद मागू शकणार नाही. त्यामुळे यात्रा काढण्यापेक्षा भाऊंनी कायदा शेतकरी हिताचा होईल यासाठी प्रयत्न करावेत.


कडकनाथ यात्रा काढणार

आत्मनिर्भर यात्रेला उत्तर म्हणून कडकनाथ घोटाळ्यात गंडा बसलेल्या शेतकऱ्यांना घेवून आम्हाला न्याय द्या आमचे पैसे परत द्या असे आवाहन करत कडकनाथ यात्रा काढणार त्याची सांगता इस्लामपूर येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत करणार असल्याचा इशारा खराडे यांनी दिला.

Post a Comment

0 Comments