बाज येथे नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील बाज येथे पुजा धनाजी काळे (वय २२, मुळ रा.अष्टविनायक नगर वारणाली सांगली, सध्या रा.विजयनगरवाडी, बाज) या नवविवाहितेने गळपास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारा घडली आहे.  याप्रकरणी जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुळ कवटेमहांकाळ येथे पुजा आई व भाऊ यांच्यासह राहत होती. २१ जूलैला रोजी पूजा यांचा विवाह वारणाली सांगली येथील सीआयएसएफ मध्ये नोकरीस असलेल्या धनाजी काळे यांच्याशी झाला होता. पती धनाजी काळे सुट्टी संपल्यामुळे १२ ऑगस्ट २०२० ला छत्तीसगड येथे नोकरीस गेला होता. तेव्हापासून पुजा सांगली येथे माहेरी राहत होती. चार दिवसापुर्वी ती कवटेमहांकाळ येथे आईकडे आली होती. मंगळवारी आज रोजी विजयनगरवाडी बाज येथील पुजाचे मामा बाळू मुकिंदा गडदे यांच्याकडे आई, भाऊसह पुजा आली होती. मामा बाळू यांच्या घरापासून काही अंतरावर ऊसतोड सुरू असल्याने घरातील सर्वजण दुपारी २ च्या सुमारास तिकडे गेले होते. या वेळी घरात कोणी नसल्याने पुजाने घरातील अँगलला गळपास लावून आत्महत्या केली. दरम्यान मामा व अन्य कुंटुबिय घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला.


Post a Comment

0 Comments