ओंकार स्वरूपा युवा आदर्श पिढी घडवेल- पोलिस उपअधिक्षक रत्नाकर नवले

जत/प्रतिनिधी: येळवी येथील ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेतर्फे रक्तदान शिबिर व आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे वाटप जत पोलीस उपअधिक्षक रत्नाकर नवले यांच्या हस्ते करण्यात आले. 

            कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत ओंकार स्वरुपा फौंडेशन संस्था येळवीच्या विद्यमाने रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आज महाराष्ट्रातील रक्ताची कमतरता लक्षात घेऊन संस्थेने रक्तदान शिबिर घेऊन जीवनदान देण्याचे कार्य केल्याने त्यांचे कौतुक पोलीस उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले यांनी केले. नवले साहेब म्हणाले स्पर्धा परीक्षेसाठी वाचनाची प्रक्रिया प्राथमिक व्यवस्थेतून केली पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड जोपासने महत्त्वाचे आहे. पुढे म्हणाले कोणतेही यश मिळवण्यासाठी परिस्थिती आणि ठिकाण याचे महत्त्व नसते, तर त्यासाठी यश मिळविणेसाठी कष्टाचे पवित्र असायला हवे.

             कोरोना महामारीच्या काळात येळवी व येळवी परिसरातील जनतेची आरोग्य सेवा देणारे येळवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.कणसे साहेब व भूमिपुत्र प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. नितीन पतंगे यांचा "कोरोना योध्दा" म्हणून संस्थेच्या वतीने विशेष  सत्कार करण्यात आला.

             संस्थेच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास मास्क व कॅप भेट देण्यात आली. सदर रक्तदान शिबिर पार पाडण्यास नवनाथ पवार, तुकाराम सुतार, विजय पाटील, गणेश सोंगेटे, सचिन स्वामी, ओंकार सुतार, आनंद सुतार, सहशिक्षक दत्तात्रय चौगुले, नारायण जगदाळे ,ज्ञानेश्वर शिंदे सर,प्रियंका कदम मॅडम शिक्षकेतर स्टॉप करण साळुंखे आदीनी परिश्रम घेतले.

             ओंकार स्वरूपा या संस्थेने ग्रामीण व गरीब,गरजु जनतेसाठी आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड तयार करण्यासाठीचे शिबिराचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी प्रधानमंत्री जन आरोग्य चे मार्गदर्शक श्री. अजित हळिंगळे सरांनी या योजनेमध्ये समाविष्ट आजार, हॉस्पिटल बाबत लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले.

             यावेळी युवा नेते आमदारपुत्र धीरज सावंत, आर. पी. आयचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, जत पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब कोडग, सांगली जिल्हा मार्केट कमिटीचे संचालक अभिजीत चव्हाण, कामगार सेना राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे, जत पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण येळवीचे सरपंच विजयकुमार पोरे , ज्येष्ठ नागरिक पंचाक्षरी अंकलगी, उपसरपंच सुनील अंकलगी, पत्रकार मारुती मदने, गजानन पतंगे, संजय कांबळे, बजरंग चव्हाण, रामकृष्ण गंगणे, अॅड.सागर व्हनमाने, बालरोगतज्ञ  डाॅ.नितिन पतंगे, प्रा.आ.केंद्र येळवीचे डॉ.कणसे साहेब, ओंकार स्वरूपा अध्यक्ष दीपक अंकलगी, सचिव तथा ग्रा.पं.सदस्य संतोष पाटील उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments