कोसारी येथे जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात सहा जनांविरोधात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल


जत/प्रतिनिधी: कोसारी ता.जत येथे जमिनीच्या वादातून रावसाहेब राजाराम हेगडे (वय 35 रा.कोसारी ता.जत) व अन्य तिघांना जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी 6 जनांविरोधात जत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान कोसारी येथे घडली आहे. या प्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही. आरोपी फरार आहेत, त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, रावसाहेब हेगडे व जाधव यांची शेत जमीन लगत लगत आहे. जाधव यांनी त्यांच्या शेतजमिनीत नव्याने बांध घातला आहे. सदरचा बांध व्यवस्थित घातला नसून वाकडातिकडा घातला आहे. तो बांध व्यवस्थित घालावा अशी विनंती रावसाहेब हेगडे यांनी जाधव यांना केली होती. यासंदर्भात यापूर्वी फोन वरून व प्रत्यक्ष भेटून बाचाबाची झाली होती. यासंदर्भात सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान जाधव व हेगडे यांच्या घरातील प्रत्यक्ष शेत जमिनीवर गेले आसता, तेथे हेगडे यांच्या घरातील नागरिकांना जाधव यांनी एकत्रित मिळून काठीने मारहाण करून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी विशाल जाधव, बबन सुबराव जाधव, अरूण रावसाहेब जाधव, राजू बबन जाधव, पांडूरग रमेश जाधव, नानासाहेब सुबराव जाधव यांनी लाथा बुक्या व काठीने मारहाण करून जखमी करत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी हेगडे यांनी जत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले करत आहेत.

Post a Comment

0 Comments