कडाक्याची थंडी, शेकोटी अन् स्वाभिमानीचे शेतकऱ्यांसहित जागर आंदोलन


सांगली/प्रतिनिधी: राजधानी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठींबा म्हणून स्वाभिमानीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एक रात्र अन्नदात्यांसाठी जागविली. किसान जागर करत रात्रभर थंडीच्या कडाक्यात भजन आणि गाणी गात अनोखे आंदोलन केले. सदर आंदोलन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी रात्रभर स्टेशन चौक सांगली येथे पार पडले. कडाक्याची थंडी असल्याने शेकोटी पेटवून आंदोलन सुरू होते. या वेळी राष्ट्र सेवा दलाचे सदाशिव मगदूम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शेतकरी क्रांती गीते सादर केली तर भैरवनाथ कदम, तानाजी खोत, अमोल पाटील, गव्हाणकर यांनी भजने सादर केली. 

यावेळी बोलताना महेश खराडे म्हणाले की, भाजपा सरकार देशभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन दडपू पाहत आहे. दिल्लीतील आंदोलकांवर अत्याचार करत आहे. या दडपशाहीला शेतकरी जशास तसे उत्तर देतील, ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर ते सत्तेत पोहचले आहेत. त्यांना सत्तेवरून पाय उतार करायला वेळ लागणार नाही. उद्योग पतीच्या हितासाठी सरकारचा खटाटोप सुरू आहे. बाजार समितीच्या बाहेर एम एस पी का लागू केली जात नाही? याचे उत्तर सरकार देत नाही. साठेबाजी वरील नियंत्रण काढले असल्यामुळे महागाई वाढणार आहे. जो पर्यंत तिन्ही कायदे रद्द केले जात नाहीत. तो पर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे.


यावेळी काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. त्यांनी भाजप सरकारवर कडाडून हल्ला चढविला काँग्रेसही या लढाईत मागे हटणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

युवा नेते जितेश कदम म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकार शेतकऱ्याच्यावर सुढ उगवत आहे. मात्र विधेयके रद्द करावीच लागतील अन्यथा शेतकरी स्वस्त बसणार नाहीत. 

यावेळी आंदोलनास हमाल पंचायतचे नेते विकास मगदूम, कॉ. उमेश देशमुख, डॉ. संजय पाटील, ऍड अमित शिंदे, ज्योती आदाटे, प्रा संजय बनसोडे, अभिजित हारगे, राहुल पाटील, संभाजी पोळ, कुमार तीप्पनवार, आर आर पाटील, भानुदास मोहिते आदींनी आंदोलनास पाठींबा दिला. यावेळी आंदोलनात पोपट मोरे, संजय खुंबे, संदीप राजोबा, भागवत जाधव, संजय बेले, भरत चौगुले, जगन्नाथ भोसले, महेश जगताप, सचिन पाटील, गुंदाभाऊ आवटी, प्रकाश देसाई, प्रताप पाटील, देवेंद्र धस, सूरज शेख, पारस चौगुले, सुरेश वसगदे, रावसाहेब पाटील, भैय्या पाटील, प्रभाकर पाटील, दिलीप पाटील, धन्य कुमार पाटील, मधुकर दिसले, राजेंद्र पाटील, निखिल कारंडे, बाळासाहेब लिंबेका, शांती नाथ लींबेका आदीसह शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments