जत तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीसाठी शेवटच्या दिवशी ४९२ उमेदवारांचे ५१४ उमेदवारी अर्ज दाखल

तर आज अखेर एकूण ८९० उमेदवारांचे ९१५ उमेदवारी अर्ज दाखल

जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४९२ उमेदवारांनी ५१४ उमेदवारी अर्ज दाखल केले असून, आज अखेर ८९० उमेदवारांनी ९१५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ग्रामपंचायत निहाय दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची संख्या खालील प्रमाणे आहे. अंकलगी ३०, अंकले ५०, भिवर्गी ३३,  धावडवाडी २७, डोर्ली  २०, घोलेश्वर २८, गुड्डापूर ३५, गुगवाड ३६, जालीहाळ खुर्द १९, करेवाडी (तिकोंडी) २२, कुडणूर २२, कुलाळवाडी ३०, लमाण तांडा (उटगी) ११, लमाण तांडा (दरीबडची) १४,  मेंढेगिरी २७,  मोरबगी २५, निगडी बुद्रुक ३४, सनमडी - मायथळ ४१, शेड्याळ ३८, शेगाव ४८, सिध्दनाथ २१, सिंगनहळ्ळी २७, सोनलगी २७, तिकोंडी १९, टोणेवाडी १०, उमराणी ८१, उंटवाडी २३, उटगी ५८, वळसंग ३०, येळदरी २९ याप्रमाणे आहेत.


Post a Comment

0 Comments