जतेत दिव्यांगाचा सत्कार


जत/प्रतिनिधी: वेलफेअर असोसिएशन फाॅंर दि डिसेबल्ड मिरज सचलिंत निवासी मतिमंद मुलांची शाळा जत, यांचे कडून तसेच माननीय आयुक्त दिव्यांग कार्यालय पुणे व माननीय समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्या आदेशान्वये ३ डिसेंबर २०२० रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग म्हणून जीवन जगताना अनेक शारीरिक, मानसिक, सामाजिक अडचणींना सामोरे जावून धैर्याने लढत असलेल्या जत मधील दिव्यांग मुलांच्या घरी सदिच्छा भेट देऊन पुष्प गुच्छ देऊन सत्कार करणेत आला. व दिव्यांग जागतिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी सदर मुलांच्या पालकांच्या समस्या व अडी-अडचणींबाबत विचारणा करण्यात आली.

यावेळी शाळेचे प्र.मुख्याध्यापक शरद कुलकर्णी सर व व्ही.एस पानस्कर सर तसेच शाळेतील सर्व कर्मचारी हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments