खलाटी येठे विहरीत पाय घसरून पडल्याने एकाचा मृत्यू


जत/प्रतिनिधी: तालुक्यातील खलाटी येथील दिलीप शिवराम मलमे (वय-५०) यांचा विहरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, दिलीप मलमे राहत्या घरापासून जवळच असलेल्या नाईक वस्ती येथे पिण्याचे पाणी आणण्यासाठी विहरीवर गेले होते. त्यादरम्यान पाणी आणण्यासाठी विहरीत जात असताना त्यांचा पाय घसरल्याने ते विहरीत पडले. त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद भाऊसाहेब दयाप्पा शेजुळ यांनी जत पोलिसांत दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.Post a Comment

0 Comments