पुणे पदवीधर मतदारसंघातून संभाजी ब्रिगेडचे मनोज गायकवाड यांच्या प्रचाराचा जत तालुक्यात झंझावत


जत/प्रतिनिधी: पुणे पदवीधर मतदारसंघातून संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार इंजिनीयर मनोज कुमार गायकवाड यांच्या प्रचारार्थ जत तालुक्यातील विविध शिक्षण संस्था व पदवीधर मतदारांना भेटून बहुजन समाजात वैचारिक परिवर्तन घडवून संविधानास अभिप्रीत अशी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याकरिता इंजिनियर मनोज कुमार गायकवाड यांना पहिल्या पसंतीचे मतदान देऊन विजयी करावे. असे अवाहन व विनंती संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी जत दौराच्या वेळी केले. तसेच दारूमुक्त, व्यसनमुक्त व कर्जमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी संभाजी ब्रिगेड हा एकमेव पर्याय आहे. असे मत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी व्यक्त केले. यावेळी के. एम. हायस्कुल व जुनिअर कॉलेज जत या शिक्षण संस्थतेचे अध्यक्ष श्री संतोष पट्टणशेट्टी, विष्णू पाटोळे,  तालुका कार्याध्यक्ष खंडू शिंदे,  जत शहर अध्यक्ष प्रमोद काटे उपस्थित होते.Post a Comment

0 Comments