आसंगी तुर्क येथे गॅस सिलिंडरचा स्फोटा घर जळून खाक अडीच लाखांचे नुकसान


जत/प्रतिनिधी: आसंगी तुर्क (ता. जत) येथील अशोक बसाप्पा पुजारी यांच्या राहत्या घरात अचानक गॅस स्फोट होऊन लागलेल्या आगीत घरगुती संसार उपयोगी साहित्य व रोख ७० हजार रुपये जळून खाक झाले आहे. यामध्ये अंदाजे अडीच लाखाचे नुकसान झाले आहे.

पुजारी यांनी नुकतेच नवीन घर बांधले आहे. याची वास्तुशांती गुरुवारी होणार होती या वास्तुशांती करीता चाळीस हजार रुपयेचे साहित्य देखील या जुन्या घरात ठेवले होते. दुर्दैवानं तेही साहित्य आगीत भस्मसात झाले. गुरुवारपासून नवीन घरात स्थलांतर करणार होते त्या अगोदरच जुन्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने पुजारी कुटुंबीय उघड्यावर पडले आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, अशोक बसप्पा पुजारी याचे घर आसंगी तुर्क पासून एक किलोमीटर अतंरावरील शेतातील पत्राच्या छपराच्या घरात आकस्मिक गॅस चा स्फोट होऊन आग लागल्यामुळे सर्व साहित्य ,रोख रक्कम ,धान्य जळाले आहे. ही घटना समजताच घटनास्थळी गाव कामगार तलाठी डी. वाय. काबंळे यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. यात ४ पोती ज्वारी ,२ पोती गहू, १ पोती बाजरी, तीन तोळे सोने, शिलाई मशिन १ व ७० हजार रोख रक्कम, व महत्वाचे कागदपत्रे असे एकूण २ लाख ६१ हजारचे जळीत मध्ये नुकसान झाले आहे.

Post a Comment

0 Comments