सांगली शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्षपदी मनोज हेगडे


जत/प्रतिनिधी: सांगली शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्षपदी मनोज हेगडे यांची निवड करण्यात आली.

यावेळी निवडीचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख,कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.

         निवडीनंतर मनोज हेगडे बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाची तत्वे ध्येये व धोरणे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी मी कार्य करात राहीन.

        यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस बाळासाहेब बापु पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संग्राम पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्याक शहर-जिल्हाध्यक्ष आयुब बारगीर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष उमेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments