जतमध्ये पीएसबी ज्वेलर्सकडून ग्राहकांसाठी विशेष ऑफर; प्रकाश बंडगर

जत/प्रतिनिधी: शहरातील प्रकाश शिवाप्पा बंडगर सराफ आणि ज्वेलर्समध्ये ग्राहकांची सोने खरेदीसाठी गर्दी होत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांसाठी प्रकाश शिवाप्पा बंडगर सराफ आणि जव्हेरी अर्थात पीएसबी ज्वेलर्सने विशेष ऑफर्स आणल्याची माहिती प्रकाश शिवाप्पा बंडगर सराफ आणि ज्वेर्ल्सचे मालक प्रकाश बंडगर यांनी दिली.


बंडगर म्हणाले की, कोरोनाच्या या कठीण काळात मध्यंतरी व्यवसाय अडचणीत आला होता. पण त्यानंतर ग्राहकांची पुन्हा गर्दी होत असल्याने व्यवसायाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील ग्राहक डोळयासमोर ठेवून पीएसबीने अनेक योजना आणल्या व त्याला ग्राहकांनी आतापर्यंत प्रतिसाद दिला आहे. आम्ही अॅडव्हान्स बुकिंग करून घेतो भविष्यात दर वाढला तरी बुकिंगच्या दरातच ग्राहकांना सोने, चांदी दिले जाते. यंदाही दिवाळी सणानिमित्त पीएसबी नवीन योजना आणली आहे. ग्राहक जेवढे सोने खरेदी करतील त्यावर तेवढेच चांदी फ्री देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ जतकरांनी घ्यावा, असे आवाहन प्रकाश बंडगर यांनी केले आहे.Post a Comment

0 Comments