युथ फॉर जत चे शिष्यवृत्ती वाटपाचे कार्य कौतुकास्पद; डॉ विवेकानंद राऊत

विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या आवाहनाला देश-विदेशातून प्रतिसाद


जत/प्रतिनिधी: समाजातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील  गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीसोबतच शैक्षणिक मदत करण्याचे युथ फॉर जतचे कार्य हे नक्कीच कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद राऊत यांनी केले. युथ फॉर जतचा यंदाचा टॅलेंट स्कॉलरशिप सण 2020 वितरण सोहळा त्वचारोग तज्ञ डॉ. सुनील भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत जत येथे नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ. विवेकानंद राऊत हे उपस्थित होते.

ज्या मातीत आपण लहानाचे मोठे झालो त्या मातीचे ऋण फेडण्यासाठी आणि जत सारख्या ग्रामीण भागातील गरजू आणि हुशार मुलांना दरवर्षी आर्थिक मदत करण्याच्या हेतूने शिष्यवृत्ती वाटप करण्याच्या ह्या अभिनव उपक्रमाची जतच्या इतिहासात नक्कीच दखल घेतली जाईल. कुठल्या प्रकारे कोणतीही जात, पंथ, वर्ग न पाहता अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्पक्षपणे विद्यार्थी निवडीची प्रक्रिया पार पाडून त्यांना फक्त शिष्यवृत्ती वाटप करून न थांबता त्यांना प्रत्येक पावलागणिक मदत आणि मार्गदर्शन करण्याचे काम युथ फॉर जत करीत आहे. यावेळी डॉ सुनील भोसले यांनीही उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमूख उपस्थिती असणारे मान्यवर डॉक्टर यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान पत्र देऊन यूथ फॉर जत तर्फे सन्मान करणेत आला. युथ फॉर जत ने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत, जत तालुक्याच्या विविध भागातून  कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते. प्राप्त अर्जांमधून अत्यंत पारदर्शक पध्दतीने विद्यार्थ्यांना गुणांकन करून विजेत्यांची निवड करणेत आली.

यामध्ये विज्ञान विभागातून कु.राणी उत्तम कांबळे (प्रथम), कु.लक्ष्मी श्रीशैल स्वामी (द्वितीय), कु.मेघा शिवाजी पाटील (तृतीय), अमोल परिस माने (चतुर्थ) तर कला विभागातून कु.लक्ष्मी विष्णू पवार (प्रथम), कु.गीतांजली प्रकाश जाधव (द्वितीय), कु.कुसुम पांडुरंग चव्हाण (तृतीय) तसेच वाणिज्य विभाग कु.शुभांगी आबासाहेब पाटील (प्रथम), कु.रेश्मा सत्याप्पा भोसले (द्वितीय), कु.सौम्या श्रीकांत कुलकर्णी (तृतीय) यांबरोबरच 16 उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.

यंदाचा शिष्यवृत्ती वाटप सोहळा खऱ्या अर्थाने वेगळा ठरला. विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या आवाहनाला देश-विदेशातून प्रतिसाद मिळाला. अमेरिका आणि इंग्लंड देशातून आलेल्या मदतीच्या जोरावर इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षिसे वाटण्यात आली. अमेरिकेतून आलेल्या मदतीमुळे शिष्यवृत्ती पात्र प्रत्येक विद्यार्थ्यांस बक्षिसा बरोबरच काही रोपे देण्यात आली. ही रोपे लावून पुढील वर्षी पर्यंत त्याचे संवर्धन केल्यास अधिकची बक्षीसे देण्यात येणार आहेत. वृक्षारोपण व संवर्धन माहिती श्री.भक्तराज गर्जे यांनी उपस्थिताना दिली.

या कार्यक्रमाला युथ फॉर जत चे अध्यक्ष दिनेश शिंदे, उपाध्यक्ष ऍड राजकुमार म्हमाणे, सचिव अमित बामणे यांच्यासह सचिन जाधव, प्रमोद साळुंखे, जितेंद्र बोराडे, भक्तराज गर्जे, डॉ सतीश मोगली, डॉ संजय व्हनखंडे, सागर चंप्पनवर, अमर जाधव, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भुपेंद्र कांबळे यांनी केले.


Post a Comment

0 Comments