बेवनूर येथे सेतजमिनिसह घरांचे नुकसान करणाऱ्या कंपनीवर कारवाई करा; संभाजी ब्रिगेड


जत/प्रतिनिधी: बेवनूर ता.जत येथे दिलीप बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनचे दगड उत्खनन चालू असून. परिसरातील शेत जमिनीवर अतिक्रमण व तसेच बोर ब्लास्ट मुळे होणारे घरांचे नुकसान आणि नागरिकांच्या जीवतास असलेला धोका या अन्यायकारक बाबी त्वरीत थांबवून, आज अखेर झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने जिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी जत उपविभागीय अधिकारीसो प्रशांत आवटे, तहसिलदारसो सचिन पाटील जत व मा.पोलीस निरीक्षकसो उत्तम जाधव जत पोलीस ठाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, मौजे बेवनूर ता. जत येथील गटनंबर 249 मध्ये दिलीप बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड(DBL) या कंपनीचे उत्खनन चालू आहे. तसेच तेथील शेजारील जमिनीवर ते अतिक्रमण करत आहेत. वारंवार तोंडी सूचना देऊन देखील ते ऐकत नाहीत व मोठ्या प्रमाणात अमोनियाचा वापर करून 20 फुटापेक्षा जास्त खोल घेऊन बोअर ब्लास्ट करत आहेत. त्यामुळे परिसरातील घरांचे नुकसान  होऊन त्यास भेगा पडल्या आहेत. संरक्षित कंपाऊंड नसल्यामुळे चरायला जाणारी जनावरे आत  पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी त्वरित दिलीप बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड (DBL) या कंपनीवर कारवाई होऊन अतिक्रमण केलेल्या शेतजमीनींची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कंपनीने द्यावी व परिसरातील ज्या घरांचे नुकसान झाले आहे. त्यांची नुकसान भरपाई द्यावी व सरकारी मोजणीने उत्खनन क्षेत्र त्वरित निश्‍चित करावे. सदर जागेस संरक्षित कंपाउंड करावे व सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही संभाजी ब्रिगेड करून आपणास विनंती आहे. तसेच यापूर्वी सदर कंपनीच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे उडणाऱ्या प्रचंड धुळीबाबत अर्ज देऊन सुध्दा आजअखेर कोणतीही कारवाई झाली नाही. अवजड वाहतूक करताना रस्त्यावर दगड पडतात तसेच सदर वाहनावर ताडपत्री झाकत नाहीत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. तरी वरील मागण्यांची दखल न घेतल्यास संभाजी ब्रिगेड शेतकर्‍यांसहित येत्या काही दिवसात न्याय मिळेपर्यंत तीव्र आंदोलन करणार आहे. 


यावेळी निवेदनावर संभाजी ब्रिगेड जिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश नाईक, दादासो वाघमोडे, विजयकुमार नाईक, संदिप नाईक, मच्छिंद्र शिंदे, शिवाजी शिंदे, बबन शिंदे, अशोक शिंदे, राजेंद्र शिंदे, तानाजी शिंदे, लक्ष्मिबाई शिंदे, संभाजी शिंदे, नारायण शिंदे, सोपान शिंदे, भारत शिंदे, लक्ष्मण पाटील, मोहन पाटील, नारायण पाटील, बापूसो शिंदे, शिवाजी शिंदे, अरूण शिंदे, विजय शिंदे, इंदूबाई शिंदे इत्यादी नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments