मारुती घोडके यांचा प्रामाणिक पणाबद्दल सत्कार


जत/प्रतिनिधी: जत मधील सामाजिक कार्यकर्ते, लेखक मा. मारुती घोडके यांचा प्रामाणिक पणाबद्दल सत्कार करतान्यात आला. यावेळी लक्ष्मी ज्वेलरीचे मालक रविंद्र शिंदे, हनमंत देवकुळे, क्रुषी सहाय्यक सचिन चव्हान हे उपस्थित होते.


जत बाजार पेठेतील सराफ व्यावसायिक रविंद्र शिंदे यांचेकडून मारुती घोडके याना दहा हजार रुपये ज्यादा आलेले होते. हि बाब घोडके याना घरी जावुन पैसे मोजल्यानंतर त्यांच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी रविंद्र यांना फोन करून सांगितले. त्यांच्या या प्रामाणिक पणाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments