करजगीत एकाची गळफास घेऊन आत्महत्या


जत/प्रतिनिधी : करजगी ता.जत येथील मढीवाळप्पा पराप्पा तिकोटी (वय 50) या मजूराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी उमदी पोलीसात फिर्याद दाखल आहे.


अधिक माहिती अशी की, मढीवाळप्पा तिकोटी हे मागील दहा वर्षापासून वाळवा येथे मजुरी करत होते. त्यांच्या समवेत त्यांची पत्नी, दोन मुले असे कुंटुबासह राहत होते. गेल्या आठ दिवसापुर्वी ते दीपावलीसाठी करजगी ता.जत या त्यांच्या मुळगावी आले होते. गुरूवारी गावाशेजारी असलेल्या रुद्रप्पा अक्कलकोट यांच्या शेतात मढीवाळप्पा यांचा लिंबाच्या झाडाला गळफास लावलेला संशयास्पद मृत्तदेह आढळून आला. 


रुद्राप्पा अक्कलकोट यांनी उमदी पोलीस ठाणे वर्दी दिली आहे. घटनास्थळी उमदी ठाण्याचे उपनिरीक्षक नामदेव दांडगे, बीट हवालदार नितीन पलुसकर यांनी मृत्तदेह खाली उतरवत, उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास नितीन पलुसकर करत आहे.

Post a Comment

0 Comments