जागर फाउंडेशनकडून मिठाई व फराळाचे वाटप


जत/प्रतिनिधी: जत शहरातील जागर फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने शहरातील गोल्हार वस्तीमधील नागरिकांना मिठाई व फराळाचे वाटप करण्यात आले. जागर फाउंडेशन ही सामाजिक संस्था शहरासह जिल्ह्यात गेल्या सहा वर्षापासून सामाजिक व शैक्षणिक कार्य करत आहे. दरवर्षी प्रमाणे जत शहरातील गोल्हारवस्ती येथे जागर फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने दिपावलीनिमित्त मिठाई व फराळाचे वाटप करण्यात येते. पण यावेळी दिपावली काळात गोल्हारवस्ती मधील एका नागरिकाचे आकस्मित निधन झाल्यामुळे दिवाळीच्या वेळी फराळ वाटप करण्यात आले नाही. परंतु आज मंगळवारी जागर फाउंडेशन यांच्या वतीने गोल्हार वस्ती येथे जागर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे यांच्या नेतृत्वाखाली मिठाई व फराळाचे वाटप करण्यात आले.

       यावेळी युवक नेते योगेश बाबा मोटे, जागर फाउंडेशनचे उपाध्यक्ष अमोल कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश्वर जाधव, ओंकार कांबळे, अविनाश साळे, विजय कांबळे, प्रतीक संकपाळ, सुनील शिंदे, प्रसाद शिंदे व सागर  पाथरूट आदि पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. 

       यावेळी बोलताना जागर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे म्हणाले की, जागर फाउंडेशन हे नेहमी आजपर्यंत शहरासह जिल्यात सामाजिक कार्य  तसेच स्वच्छता अभियानात प्रभावीपणे काम करत आहे. तसेच कोरोनाच्या काळातसुद्धा गरजू नागरिकांना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले होते. गोल्हार बांधवांची दिवाळी गोड व्हावी म्हणून व चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद मिळावा यासाठी हा उपक्रम आम्ही गेल्या पाच वर्षापासून राबवत आहोत. सणाच्या काळातच फराळ वाटप करणे ठरवले होते, मात्र गोल्हारवस्ती मधील एका नागरिकाचे आकस्मित निधन झाल्यामुळे दिवाळीच्या वेळी फराळ वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे आज मंगळवारी फराळाचे वाटप केले. गरीब नागरिकांना देखील दिवाळीचा आनंद मिळावा या उद्देशाने जागर फाऊंडेशन तर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबद्दल गोल्लार वस्तीतील सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

       यावेळी युवा नेते योगेशबाबा मोटे म्हणाले की, जागर फाऊंडेशन नेहमीच निरनिराळे सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच इतर कार्यसुद्धा जोमाने  करत आहे.जागर फाऊंडेशनचे कार्य उल्लेखनीय असून यापुढेही त्यांच्या कार्यात सदैव सोबत राहू.

Post a Comment

0 Comments