जतेत जागर फाउंडेशन व योगेश बाबा मोटे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात स्वछता अभियान


जत/प्रतिनिधी: शहरातील जागर फाउंडेशन व योगेशबाबा मोटे युवा मंच या सामाजिक संस्थांकडून शहरात स्वछता अभियान राबविण्यात आले. जत शहरात दिपावली लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर फोडण्यात आलेले फटाके व रस्त्यावरती विखुरलेला इतर कचरा गोळा करून जत शहर स्वच्छ करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. ऐन सणाच्या कलावधीत कचरा उचलणे आवश्यक असल्याने एक समाजसेवा म्हणून कचरा उचलून बाजारपेठ स्वच्छ करण्यात आली. या राबविण्यात आलेल्या अनोख्या अभियानाबद्दल जागर फाउंडेशन व योगेशबाबा मोटे युवा मंच यांचे जत शहरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे. 


जत नगरपरिषदेकडे असलेला अपुरा कर्मचारी पुरवठा  लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आल्याचे जागर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे यांनी सांगितले. यावेळी शहरातील सर्व कचरा उचलून शहराबाहेरील कचरा डेपो मध्ये टाकण्यात आला.

यावेळी नितीन साळे यांनी गोळा केलेला कचरा उचलून भरण्यासाठी मोफत ट्रॅक्टर दिला. तर शहरातील नामवंत चहा व्यवसायिक ईलाही कुरुंदवाड यांनी मोफत चहा देऊन स्वच्छता अभियानाला पाठींबा दर्शवला. यावेळी मोरे व मोटे म्हणाले की, कोरोणाच्या पार्श्वभूमीवर आपले जत शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हे स्वच्छता अभियान राबविले आहे. यापुढील कालावधीत सुध्दा अशाच प्रकारचे सामाजिक कार्य करत राहू यासाठी सर्वांनी साथ देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


यावेळी जागर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष  परशुराम मोरे, पत्रकार अमोल कुलकर्णी, भागवत काटकर, निलेश माने, योगेश मोटे, आनंद कांबळे, अभिनंदन साबळे, सागर पाथरूट, प्रतिक संकपाळ, अविनाश साळे, ओंकार कांबळे आदीजन उपस्थित होते

Post a Comment

0 Comments