भिवर्गी ते कर्जगी मार्गावरील बोर नदी पात्रात वाहून गेलेल्या युवकाचा सांगलीतील जीवरक्षक टीमकडून शोध सुरू


जत/प्रतिनिधी: तालुक्यातील भिवर्गी ते करजगी मार्गावरून दुधाची वाहतूक करत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने पिंटू भिमू धायगुडे (वय 32, रा.सनमडी ता.जत) हा पाण्यात वाहून गेल्याची घटना गुरूवारी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. या युवकाचा अद्याप शोध लागलेला नाही. आज सकाळपासून सांगलीच्या जीवरक्षक टिमकडून या युवकाचा शोध घेण्यात येत आहे.

गुरूवारी सकाळपासून स्थानिक नागरिक व उमदी पोलीसांच्या सहकार्याने त्या युवकाचा शोध घेण्यात आला मात्र त्याला शोधण्यात अपयश आले आहे. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने मोठ्या अडचणी येत आहेत. आज सकाळी सांगलीच्या जीवरक्षक टिमला प्राचारण करण्यात आले आहे. टीमच्या सदस्याकडून शोध मोहिम सुरू आहे. पुलावरून आजही पाण्याचा मोठा प्रवाह सुरू आहे. यामुळे त्या युवकास शोधण्यास अडचणी येत आहेत.Post a Comment

0 Comments