बेवनूर येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यूजत /प्रतिनिधी : जत तालुक्यासह परिसरात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरासह तालुक्यात विजेच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसाने तालुक्यात असणाऱ्या द्राक्ष बागांसह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर जत तालुक्यातील बेवनुर येथे वीज पडून एक जण जागीच ठार झाला आहे. बाजीराव नारायण शिंदे (वय ६०) असे मृत्यू झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती, बाजीराव शिंदे हे जनावरांना चारा टाकून घराकडे परत येत असताना मुसळधार पावसाची सुरुवात झाली होती. दरम्यान विजेचा कडकडाट सुरू होता, यावेळी बाजीराव शिंदे यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे बेवनूर गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments