जत पोलिसांनी केले दोघा मोटारसायकल चोरट्यांना जेरबंद; तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

 जत/प्रतिनिधी: जत शहरात चोरीस गेलेल्या पाच मोटार सायकलीसह दोघा मोटार सायकल चोरट्यांना पकडून तीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जत शहरासह विविध ठिकाणी मोटरसायकल चोरीचा छडा जत पोलीसाच्या पथकाने लावला आहे. याप्रकरणी राकेश सुरेश काळे (वय १९, रा.मधला पारधी तांडा), दिलीप हिमलू राठोड (रा.उमराणी रोड, स्टिल कॉलनी या दोघा चोरट्यांना पकडण्यात आले आहे. 

याबाबत जत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जत शहरात काही दिवसापुर्वी घरासमोरून बुलेटची चोरी झाली होती. याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलीस नाईक प्रवीण पाटील, पो.कॉ. केरबा चव्हाण, महादेव पाटील,   पो.कॉ. तेली यांच्या पथकाकडून जत शहरातील रेकार्ड वरील गुन्हेगार, चोरी प्रकरणातील आरोपीवर निगरानी सुरू करण्यात आली होती. त्या दरम्यान राकेश काळे व दिलीप राठोड यांच्या संशय आल्यानंतर त्यांच्याकडे चौकशीनंतर या मोटार सायकली आढळून आल्या आहेत. त्यांना ताब्यात घेऊन पाच मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तपास जत पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments