कंठी खून प्रकरणातील फरारी तीन आरोपीना एलसीबीने केले जेरबंद; सोलापूर जिल्यातील हुलजंती येथून केले अटकजत/प्रतिनिधी: कंठी ता.जत येथील धनाजी नामदेव मोटे (वय 43) याचा अनैतिक संबंधातून निर्घृण खून करण्यात आला होता. ही घटना गुरुवारी दि.8 रोजी रात्री घडली होती. खून प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी मुख्य आरोपी नागेश भीमा लांडगे यास दि.9 रोजी अटक करून 14 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर मोटे खून प्रकरणातील अन्य तिघे संशयित अद्याप फरारी होते. या तिघांच्या अटकेसाठी तीन पथके वेगवेगळ्या भागात रवाना झाले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकाणे दोन दिवसात या गुन्हयातील मुख्य अरोपी नागा ऊर्फ नागेश भिमराव लांडगे, गोविंद नागेश लांडगे, मुरलीधर मधुकर वाघमारे, श्रीधर मधुकर वाघमारे (सर्व रा.कंठी ता.जत) यांना मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथून ताब्यात घेण्यात आला आहे. त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे कंठी ययेथे झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता, या आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. 

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण शिंदे, अभिजित सावंत, पोलीस हवालदार जितेंद्र जाधव, राजाराम मुळे, राजू शिरोलकर, संदीप गुरव, संदीप पाटील, आमसिध्द खोत, संदीप नलवडे, अनिल कोळेकर, चा.शंकर पाटील ,अरुण सोकटे यांनी केली.Post a Comment

0 Comments