जत तालुक्यातील विविध विकास कामांचे आ. विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

 


जत/प्रतिनिधी: तालुक्यातील पच्छापूर येथे जिल्हा परिषदेच्या 4 नवीन शाळा खोल्या व जिल्हा नियोजन मधून 2 खोल्या बाधने, नूतन व्यायाम शाळा बांधणे, देवनाळ येथे देवनाळ पाच्छापूर रस्ता ते बिराजदार वस्ती खडीकरण करणे, मेंढीगेरी येथे मेंढीगेरी डोंनपिर रस्ता CD वर्क, गावठाण ते कोळी वस्ती रस्ता मुरुमीकरण करणे, उमराणी येथे सरसेनापती प्रतापसिंह गुजर स्मारक सुशोभीकरण करणे, बिळूर येथे गुरुबसवेश्वर विरक्त मठ येथे पेव्हींग ब्लॉक, गुगवाड येथे ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधणे, सामाजिक सभागृह बांधणे, एकुंडी येथे सामाजिक सभागृह बांधणे यासह सर्व कामाचे भूमिपूजन आमदार विक्रमसिंह(दादा) सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आपराया काका बिराजदार, माजी पं.स.सभापती बाबासाहेब तात्या कोडग, जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, जिल्हा परिषद सदस्या कलावती गवरगोंड, जत मार्केट कमिटी माजी सभापती अभिजित दादा चव्हाण, माजी पं स.सदस्य मलेश अण्णा कत्ती, पं स.सदस्य दीघवीजय चव्हाण, अमर इंगोले, जत तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुजय नाना शिंदे, शाखा अभियंता शेख साहेब, विद्यानंद भोसले, महेश कोळी, माजी संचालक बाबा पाटील, श्रीशैल पाटील, हणमंत घेज्जी, विठठल धोडमनी, सांगू पाटील, आबासाहेब पाटील, माजी सरपंच गांगप्पा कोकणे सर्व गावातील संरपच, स्थानिक अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments