हाथरस घटनेतील आरोपींना फाशी द्या; जत तालुका वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

जत/प्रतिनिधी: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथिल बहुजन मुलीवर अमानुषपणे बलात्कार करुन ठार करणाऱ्या आरोपींवर कडक फाशीची शिक्षा व्हावी. व या गुन्ह्यावरती पांघरूण घालणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे जत तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. वंचितचे तालुकाध्यक्ष अमोल साबळे व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन जत तहसीलदारसो, प्रांताधिकारी व जत पोलिस ठाण्यात देण्यात आले.

या निवेदनावर तालुकाध्यक्ष अमोल साबळे, प्राचीन भारतीय लवनकार परीसंघाचे महासचिव प्रा.एन.के.हिप्परकर, प्रा.टि. एम.वाघमोडे, आण्णासाहेब हारगे, प्रमोद सावंत, विकास शिवशरण, ज्ञानेश्वर केंगार, अनिल ढावरे, आकाश शिवशरण, रत्नाकर देवडे, श्रेयस कांबळे, अमित काळे, सौ. कमल हारगे, आकाश कांबळे, साबीर शिकलगार, जुबेर मंगळवेढे, सुरेश कोळी, उमेश कांबळे, सचिन पुजारी आदींच्या सह्या आहेत.

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशमधील हाथरस घटनेने पूर्ण भारत देशामध्ये प्रचंड चिड व संताप निर्माण झाला आहे. एका युवतीवर अमानुषपणे बलात्कार करुन तिला प्रचंड प्रमाणात मारहाण करुन तिची जिभ कापून व पाठीचा मणका मोडुन तिचा खून केल्याची घटना घडली. सदरील कृत्य माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवित असून सदर घटनेची सखोल चौकशी सुप्रिम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीशांद्वारे होवून जलदगती स्वतंत्र कोर्टामार्फत याची कार्यवाही व्हावी.

वरील घटनेतील आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी. सदर घटनेमध्ये आरोपींना संरक्षण देणे, पुरावा नष्ट करणे, मिडीयांना रोखणे, मयत मुलीच्या कुटुंबियांना धमकावने, नातेवाईकांना विश्वासात न घेता मृत मुलीच्या प्रेताची परस्पर विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करणेकामी हाथरस जिल्ह्याचे प्रशासकीय
अधिकाऱ्यांनी निंदनीय भुमिका पार पाडली आहे. गुन्हेगारांला संरक्षण देण्याचे काम केले आहे. त्यांना याबाबत जबाबदार धरुन त्यांच्यावरती आरोप दाखल व्हावेत व कडक शिक्षा व्हावी.

पिडीतेच्या कुटुंबियांना व त्यांच्या नातलगांना संरक्षण पुरवावे. मानसिक धक्क्यातुन सावरण्यासाठी त्यांना शासनाने आधार द्यावा व भरीव आर्थिक मदत करावी व पिडीत कुटुंबाचे पुर्नवसन करावे. उत्तर प्रदेशातील मागासवर्गीय बांधवांच्यावरती कायम अन्याय होत असल्याचे दिसते. तसा अन्याय यापुढे होवू नये म्हणुन शासनाने योग्य ती पावले उचलावीत. कायद्याची अंमलबजावणी करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या व प्राचीन भारतीय लवनकार परिसंघ,
नवी दिल्ली यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

Post a Comment

0 Comments