खलाटी येथे कोरोना सुरक्षा ग्राम मोहीमेस प्रारंभ

जत/प्रतिनिधी: नागरिकांमध्ये कोरोनाविषयक जनजागृती व भीती दूर करणे ही काळाची गरज आहे. असे मत सांगली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव (पाणी व स्वच्तता विभाग) यांनी व्यक्त केले ते खलाटी ता.जत जि. सांगली येथे कोरोना सुरक्षित ग्राम मोहिमेच्या प्रारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी अध्यक्ष स्थानी सरपंच संतोष नाईक उपस्थित होते. तसेच या वेळी जत पंचायत समिती गट विकास अधिकारी डी. बी. खरात, ग्रा.प. विस्तार अधिकारी पांडुरंग चव्हाण. डॉक्टर विजय कोळेकर यांच्या उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम पार पडला.

या वेळी गटविकास अधिकारी म्हणाले कि, हि मोहीम ५ ऑक्टोबर ते दिनांक ३१ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण सांगली जिल्हात राबविली जाणार आहे . जनतेच्या सहभागातून कोरोना सुरक्षित ग्राम मोहिमेच्या माध्यमातून कोरोना विषयक जनजागृती केली जात आहे. या मोहीम कालावधीत गावात रुग्ण न सापडल्यास गाव कोरोना मुक्त संबोधण्यात येईल व गाव बक्षीस पात्र ठरणार आहे. या कार्यक्रमास खलाटी गावचे उपसरपंच तुकाराम देवकते, मुकेश बनसोडे, ग्रा.प सदस्य वैजंता नाईक, ग्रामसेवक अतुल डामसे, अंगणवाडी सेविका,मदतनीस व आशा स्वयंसेविका व गावातील सामाजिक कार्यकर्त, स्वयंसेवक आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments